Saturday 17 September 2011


प्रेमाची पराकाष्ठा

जादू सारखा तो सान्निध्य 
फेसाळ हृदयाची तटी खेळतो 
नीळ हिरवा आयुष्याचे 
उतरण, अशांत तरणी लिहते 
प्रीतीची तरंगीत लिपी 
निर्विकार लोचनी 
रात्र उतरते, गहन सागरी
तुझ अंतरंगीय गंधात 
उठतात, स्वप्नाची कस्तुरीत
भिजलेली मृदू प्रणय  
अस्पर्शित भावना उघडते 
अंतर्मनाची तुरुंग,
उन्मुक्त आकाशी उडतात 
 अभीलाषित सारस युगळ, 
मुक्तीच्या मार्गी जणू
खाली पडतात जीर्ण पल्लव,
इच्छितो हृदय, धरून 
ठेऊ कुठे तरी, उडतात वन्य 
कापूस, चंद्रीमाच्या  चूर्ण 
काजवाचे नीलाभ प्रदीपन, 
नवीन पानात शिशिर बिंदू
या मुहूर्ती जणू नदीच्या झिझ 
बांधते नूतन पतपेढी,
बुडून चालले बाभूळ वन, 
परित्यक्त बांध्य भूमी 
जीवनाचे अवसाद, हिंसा, 
विषमताच्या उपग्रह, या क्षणी 
जीवन शोधतो, विलुप्तीच्या पथ
प्रेमाची पराकाष्ठा 
सत्यचा अधिप्रमाणित रूप !

-- शंतनू सान्याल 






   

Thursday 15 September 2011

काळजयी प्रेम

दक्षाचे अग्निकुंड ओलांडून 
होमाग्निच्या मार्गी, आहुतेचा
ज्वलंत वेशी, केव्हा तरी एकदा 
कदाचित भाष्मीभूत शरीरी
या जवळ माझे,पांगणून 
करिदंतीय पदर,
ती रक्तिम किनारी 
हृदयाचे वाळवंटात अजून 
रिक्त कुंभाची तृषा खेळतो 
सनिर्बंध, विक्षिप्त, ती अपरिभाषित
सुरभी, पसरतात अविराम, अनंत 
आयुष्य सागरी, द्रौपदीची 
उन्मुक्त केशात लुप्त 
सूर्य चंद्राची ती 
मायावी पृथ्वी, सृष्टी कमळ घेऊन 
हाती, जर तर संभव स्वयंसिद्धा
रूपी, हे प्रेयसी! या माझा 
उध्वस्त जीवनी, 
भूमिकाम्पित रागात, वाजवून रुद्र 
वीणा, त्रिलोक नयनी उठवून 
मुक्ती छंद, सुप्त 
वसुधाची छातीवर प्रलयाचे गाणी,
सांध्य प्रदिपाचे सहस्त्र शिखात 
जागृत करा, शापमुक्तीच्या 
अखंडित रश्मी धारा,
चिर पौरुषाचे आह्वान 
महातीमिरेच्या पूर्ण समापन,
भग्न,काळजयी देऊलाचे परिपूर्ण 
पुनुरुत्थान !
-- शंतनू सान्याल 
त्या पलीकडे होता आयुष्य माझा

इथच होते काही थेंब अश्रुबिंदू किंवा
मोडलेला नभात उध्वस्त
आकाशगंगा,
समग्र रात्र गेली
टक लावून पाहता, तुझ हे
अनाकलनीय शरीरी, प्रणयाचा अर्थ
शोधता, अज्ञात
राहिले 
हृदयात दीर्घ, अतृप्त
तहान आणि निर्बंध भावना,
मुक्त तळहाती रेषांची नियती, कुठे तरी
हरवले जीवनाचे झालरी सेतू
वाट बघता क्षितिजी
आयुष्यभर
केवळ प्रबोधन हाच माझा भाग्य झाला !
पाहिलो सकाळी कोसळले पारिजातकाचे
सहस्त्र पाकळी, हृदयाचे पलीकडे,

-- शंतनू सान्याल


Friday 30 July 2010

स्पर्श शब्दांचे

 अवघड प्रश्न घेउनी ईशान्य दिशी
मेघदल पुनः अवतरले
थेंब थेंब स्पर्श शब्दांचे
गहन दर्शन, ज्ञान विज्ञान
राहू ध्या कुठेतरी तुमच्या सर्व
व्यक्ती महत्व विश्लेषण,
साहित्य संस्कृती, गीत -गाणी
पुष्प विथी, इंद्रधनुषी संगीत लहरी
जीव माझा भ्रमित होते
हि मधु छंद, हि मायावी यामिनी
मी आणि ती, सास्वत सत्य
या पलीकडे सर्वच मिथ्या
स्त्रीआणि पुरुष निसर्गाचे दोन अद्वितीय कृती
अदृश्य रेषा तुमची परिभाषा
इथच आकाश-धरत्री मिळते
इथच प्रणय, सीम्पीत जन्म घेतो
हि मिलन बिंदू
नव युगाचा आव्हान करतो
इथच नियती जन्म- मृत्यूचा अभिलेख लिहते
इथच सृष्टी आकार घेते
स्वर्ग नर्क हि तुमची कल्पना
माझी पृथ्वी रात्र दिवस
सास्वत- सत्यकरिता फक्त जगते ।
-- शंतनू सान्याल

Thursday 29 July 2010

लुप्त एक नदी

लुप्त एक नदी वाहत असते रात्र दिवस


मझ अंतरी अजून कोणी हि पाहिला नाही,

सर्व लोकांनी बाह्य जगत ओळखले

हृदयात कोणी हि पण बघितला नाही

मी आणि माझी सावली अविराम गोष्ट करतात

माझी पृथ्वी वेगळी होती, अनुराग गंधित-

समाजविहीन, स्वप्न रंजीत, मौन भाषित

माणुष फक्त माणुषसाठी

मला भूक होती प्रणय बंधुत्वाची

निशीथ संपला पण अजून प्रकाश पसरला नाही

शोधू कुठे मुकुल, मंजरी, पुष्प सुगंधित, चाहुदिशी-

अदृश्य चित्कार आणि एक बृहत मरू प्रदेश

भटक्या हृदय कुठे हि गुंथला नाही //

--शंतनू सान्याल

ध्वंस सेतू

अंग -ह्रदयी सर्वत्र माझा शापित


मी कुष्ठ वाहतो शरीरी

व्यक्तित्व भाजलेला चरित्र संदेही

हे मित्र दूरत्व बनवून ठेव माझीशी

मी अर्धरात्रीच्या प्रतिध्वनी

सांध्य प्रदीप, शंख ध्वनी नाही

मी शोधतो अश्रुबिंदू, चंद्र किरण

निशिगंध,जलतरंग नाही

जगतो पूर्ण रात्र भग्न मंदिरात

मी समाज बहिष्कृत माणुष

फिरतो झोपडपट्टी, कलंकित रस्त्यावर

अजून वेळ आहे दिशा बद्दल साठी

माझाशी प्रणय घाठ बांधू नये

रस्ता कठीण, दुर्गम कंटकमय

सकाळ बहु दूर, अपरिचित छितिजी

मी एक ध्वंस सेतू पण-

नव स्वप्न मधुर उचलून घेतो

अभिशापित माणुष हृदयात लपून घेतो /

-शंतनू सन्याल



(माझी मातृ भाषा बांगला आहे -कृपया स्वतः चूक सुधारून वाचा - धन्यवाद )